शबनम न्यूज | प्रतिनिधी
मा. नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने आयोजित भव्य ७० फुटी रावणदहन आणि मनोरंजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पारंपरिक सणाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कलाविष्कारांनी झाली. कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर मान्यवरांच्या व सिनेतारकांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर रावणदहनाचा कार्यक्रम पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. मेघनाथ, कुंभकर्ण व विशेष आकर्षण असणाऱ्या भव्य ७० फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करताच परिसर जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे माजी नगरसेवक विजय शिंदे, निलेश बारणे, प्रसाद शेट्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, सचिन ढोबळे, हेमंत फुलपगार, उमेश भामरे, सोपान कुलकर्णी, गणेश वाणी, अभिजित शिंदे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नरेश पंजाबी, मंडलाध्यक्ष अनिता वाळूंजकर, संदीप कापसे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाजातील एकोपा, सत्य आणि सद्वर्तनाच्या मूल्यांचा गौरव करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “दसरा हा केवळ रावणाच्या दहनाचा दिवस नसून, आपल्या मनातील अहंकार, ईर्ष्या आणि दुष्ट प्रवृत्तींचा अंत करण्याची शिकवण देणारा सण आहे.” मागील पंधरादिवसात महाराष्ट्रावर आस्मानी संकट कोसळले. तसेच बीड, लातूर, उस्मानाबाद अशा मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडविली. शेती, माणसे आणि पशुधन महापुरात वाहून गेली. हजारो बांधवांचे संसार रस्त्यावर आले आहेत. पूरग्रस्तांना मदत देण्याच्या भावनेने संदीप वाघेरे मित्र परिवाराने पुढाकार घेतला आणि थेट ….या भागात आम्ही दाखल झालो. तेथील मदतीचा हात देण्याचे काम केले. आपणही सर्वानी आपापल्या पद्धतीने मदत करायला हवी. तेथील प्रलय पाहून मन दुःखी झाले आहे. संदीप वाघेरे यांनी पुरग्रस्तांप्रती सहवेदना व्यक्त केली दुष्ट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीने केलेली मात म्हणजेच आजचा विजयाचा हा उत्सव आहे. जीवनातील विविध संकटं आणि आव्हानं हे फक्त तात्पुरते टप्पे असतात. परंतु, जर आपण आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगला, तर आपण त्यांच्यावर मात करून आपल्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडवू शकतो येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या व प्रभागाच्या शास्वत विकासासाठी, आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, मी मनापासून प्रयत्न करीत राहील अशी ग्वाही वाघेरे यांनी उपस्थित जनसमुदायास दिली.
या कार्यक्रमास पोलीस प्रशासन व वाहतूक शाखेचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे संपूर्ण आयोजन अत्यंत सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पडले.रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. गर्दीच्या नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन व वाहतुकीच्या नियोजनासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य ती व्यवस्था केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वाहतूक शाखेच्या समन्वयामुळे कार्यक्रम स्थळी येण्या-जाण्याच्या मार्गांवर वाहतुकीस अडथळा न होता आयोजन यशस्वी झाले. कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लोहार, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील व पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तसेच सहकारी, या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर अहिरराव यांनी केले तसेच कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, रुपेश वाघेरे, श्रीकांत वाघेरे, नितीन गव्हाणे, उमेश खंदारे, अक्षय नाणेकर, कुणाल सातव, किशोर येळवंडे, शुभम शिंदे, विठ्ठल जाधव आदींनी केले.