spot_img
spot_img
spot_img

०९ ऑक्टोबरला जे आर डी टाटा पुरस्कार प्रदान सोहळा

शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित भारतरत्न जे आर डी टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ठीक ०४ वाजता ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, जुना मुंबई – पुणे महामार्ग, चिंचवड येथे संपन्न होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर अध्यक्षस्थान भूषविणार आहेत; तसेच टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
पुरस्कार प्रदान सोहळ्यात ॲक्सिस इंजिनिअरिंग (तळवडे) चे संचालक महेश शिंदे (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगरत्न पुरस्कार), धनश्री एन्टरप्राइजेस (भोसरी) च्या संचालिका वैशाली देशमुख (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार), सिद्धकला इंजिनिअर्स (भोसरी) च्या दीपा भांदुर्गा (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगसखी पुरस्कार), ब्राईट इंडस्ट्रीज (भोसरी) चे संचालक संतोष शिंदे (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगभूषण पुरस्कार), त्रिशूल फोर्जिंग (चिंचवड) चे संचालक पांडुरंग सुतार (भारतरत्न जे आर डी टाटा उद्योगभूषण पुरस्कार), हॉटेल संगम ग्रुप (सांगोला) चे संचालक नवनाथ केदार (भारतरत्न जे आर डी टाटा युवा उद्योजक पुरस्कार) आणि बेबडओव्हळ (तालुका मावळ) च्या कुमारी समृद्धी ढमाले (भारतरत्न जे आर डी टाटा युवा उद्योजिका
पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी श्रमश्री बाजीराव सातपुते यांचे ‘टाटांना अभिप्रेत असलेला २१व्या शतकातील उद्योजक’ या विषयावरील व्याख्यान होईल. सर्व नागरिकांनी या पुरस्कार सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!