शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या योगा पार्क मधील आशिया खंडातील सर्वात मोठ्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त क्लायम्बिग वॅाल साकारण्यात आलेले आहे. तेथे आज मा विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सर्वात पहिल्या राष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून २९ वी आयएमएफ फाऊडेशन पश्चिम विभाग अंतर्गत राष्ट्रीय अजिक्यपद क्लायबिगं स्पर्धा २०२५ चे उद्घाटन नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये पश्चिम विभागातील १५० खेळाडु सहभागी झाले आहेत, या योगा पार्क मध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर उंचीची स्पीड वॅाल, २१ मीटर उंचीची लीड वॅाल आहे या योगा पार्क मध्ये लहान मुलांसाठी स्वतत्र खेळासाठी खेळणी तसेच जेष्ठासाठी व्यायामासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, या क्लायम्बिगं वॅाल मध्ये सराव करणारे खेळाडु हे नॅशनल स्तरावर खेळतील अशा उत्तम दर्जाची ही वॅाल आहे या क्लायम्बिगं वॅाल व स्पर्धेचा उद्घाटनावेळी माजी नगरसेविका निर्मलाताई कुटे आयएमएफ फाऊडेशनचा चेअरमन के सरस्वती, सेक्रेटरी श्रीकृष्ण कडुस्कर, सदस्य सुरेद्रं शेळके, निवृत्त डीजीपी ॲड नरेद्र निकम, निवृत्त लष्कर अधिकारी देवांग नायक व इतर मान्यवर खेळाडु उपस्थित होते.