पुणे, सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) मध्ये ह्यकॅथॉन १.० यशस्वीपणे पूर्ण झाले. ८ तासांचा कॅप्चर द फ्लॅग Capture The Flag (CTF) चॅलेंज, ज्यात ४००+ उत्साही विद्यार्थी सहभागी झाले होते, एसएसपीयुच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रदर्शन करत, विजेता: ₹२५,०००, प्रथम उपविजेता: ₹१५,०००, द्वितीय उपविजेता: ₹१०,००० अशी बक्षीशे जिंकली. तंत्रज्ञान आणि उत्साहाच्या वातावरणाने तज्ज्ञ, प्रायोजक आणि सहभागी यांना एकत्र आणले.
या कार्यक्रमात नामवंत वक्त्यांनी — अरुण माने, ऋषिका डी., आदित्य शेंडे, शिफा सायकलवाला, रोहित गौतम, यश चव्हाण, अभिषेक भास्कर, आणि ओंकार माळी यांनी अतिशय प्रेरणादायक आणि विचारप्रवर्तक सत्रे घेतली. त्यांच्या सत्रांनी विविध विषयांची समृद्ध माहिती दिली.
“आम्हाला ह्यकॅथॉन १.० आयोजित करण्याचा खूप अभिमान आहे, असे कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमध्ये भर घालतात. हे कार्यक्रम शिक्षण आणि सहकार्या असे दोन्हीचे महत्व मुलांना पटवून देतात.” असे डॉ. अराधना देशमुख, संचालक, एसएसपीयु यांनी सांगितले.