शबनम न्यूज
नवरात्री निमित्त सर्व परिसर भोंडल्याने,रासगरब्याने दुमदुमला आहे.यात सर्व वयोगटाच्या मुलींच्या आवडत्या सणाची म्हणजे भोंडल्याची/ गरब्याची गाणी,नृत्य चालू आहेत.आपल्या संस्कृतीची ओळख आपल्या मुलांना व्हावी..या साठी सरस्वती विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ मध्ये दरवर्षी विविध सण,उपक्रम यांचे आयोजन केले जातात.त्याचप्रमाणे या ही वर्षी शनिवार दिनांक२७/९/२०२५ रोजी प्रशालेत पालकांच्या उपस्थित भोंडला उत्सव साजरा केला गेला.यात शिशुवर्ग ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.महिला पालकही या उत्साहात आनंदाने साजऱ्या झाल्या,त्यांच्यासोबत प्रशालेतील विद्यार्थिनी,महिला शिक्षिका यांनीही आनंद घेतला.
आपल्या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी माननीय व्यवस्थापक श्री.गोविंदराव दाभाडे सर वेळोवेळी अशा उपक्रमांचे आयोजन,नियोजन करत असतात.यासाठी शिशुवर्ग ते १० वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.दरवर्षी शाळेत दुर्गा मातेचीही प्रतिष्ठापना होते..नियमित तिची आरती,तिची सेवा मनोभावे केली जाते.दोन्ही वेळेस देवीची आरती केली जाते,प्रसाद वाटला जातो.प्रास्ताविक कुमारी जान्हवी बाजगिरे या इयत्ता:सातवी,तुकडी:अ मधील मुलीने केले,तर निवेदन व हत्तीची फुलांपासून प्रतिमा साकारली सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी.सर्व महिला शिक्षकांनी,महिला पालकांनी मिळून प्रतिमापूजन केले व गाणी म्हटली.