शबनम न्यूज | प्रतिनिधी
मंगळवार दिनांक ३०/०९/२०२५ रोजी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली येथे भोंडल्याचे आयोजन करण्यात आहे. प्राचार्य सानप सर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
चित्रकला शिक्षक विश्वकर्मा चव्हाण यांनी फलकावर सुंदर हत्ती चित्र रेखाटन केले . शाळेच्या प्रशस्त क्रिडांगणावर मध्यभागी ठेवलेल्या हत्तीच्या प्रतिमेचे पर्यवेक्षिका शामला पंडित यांनी हार फुल वाहून पूजन केले . विद्यार्थ्यांनी फेर धरून टीपरीच्या तालावर भोंडला गीते सादर केली . अध्यापिका सुषमा शेवाळे ,
ज्योती घरबुडे , वृंदा क्षीरसागर ,कविता बुरूड ,
वर्षा पाटील , दिपाली काळे ,मनिषा सांडभोर ,
अध्यापक दिनेश बोरचटे,पवन खराडे , आबा वारघडे यांनी कार्यक्रम संयोजन व आयोजन केले .दत्तात्रय बुर्डे मामा, रमेश मामा यांनी माईक व्यवस्था पाहिली . भोंडल्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना खिरापत वाटण्यात आली .