spot_img
spot_img
spot_img

ओंकार सर्जेराव पाटोळे सोशल वेल्फेअर ग्रुपच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार

शबनम न्यूज , प्रतिनिधी :
सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे, या नवरात्र उत्सवात नवदुर्गांचा सन्मान केला जातो, हिंदू संस्कृतीमध्ये महिलांना दुर्गा म्हटले जाते, या दुर्गा समाजात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत या महिलांचा सन्मान या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गा सन्मान म्हणून केला जातो.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील ओंकार सर्जेराव पाटोळे सोशल वेल्फेअर ग्रुपच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला.

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलीस स्टेशन येथील सर्व महिला पोलीस कर्मचारी यांना ओंकार सर्जेराव पाटोळे सोशल वेल्फेअर ग्रुपच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महिला पोलीस आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात, या महिला आपल्या घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असतानाच शहराच्या संरक्षणाची ही जबाबदारी सक्षम पणे सांभाळतात त्यामुळे या महिला पोलिसांचा सन्मान या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने करणे म्हणजे खरा उत्सव साजरा करणे असा होतो.

यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ प्रामुख्याने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुद्र बैरागी, कार्तिक लोमटे, कुणाल कदम, माऊली कराड ,आयुष चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी सर्व उपस्थितितांचे ओंकार पाटोळे यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!