spot_img
spot_img
spot_img

अष्टपैलू व्यक्तिमत्व अंजू सोनवणे यांची शिक्षकी पेशातून सेवानिवृत्ती

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेज येथून 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे या ज्येष्ठ शिक्षिका आपल्या भरीव कार्यकीर्तीनंतर आज सेवानिवृत्त होत आहे शिक्षकीपेशा बरोबरच त्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिले शिक्षकी पेशा बरोबरच आदर्श नागरिक आणि विद्यार्थी घडवता घडवता समाजाप्रती आपण काही समाजाप्रती देणेकरी लागतो या भावनेने त्यांनी महिला बचत गट अध्यक्षा,पोलीस नागरिक मित्र, पर्यावरण संवर्धन समिती(ईसिए) टीम लीडर महिला संघटक, महाराष्ट्र साहित्य परिषद संचालिका व पिंपरी चिंचवड विभाग अध्यक्षा, सकाळ नाट्यवाचन समिती पिंपरी चिंचवड समन्वयक व सहकार्याध्यक्क्षा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सहकार्यवाह, पुणे जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा सहाय्यक आयुक्त, इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँक संचालिका जनसंपर्क अधिकारी व उपाध्यक्षा पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत जिल्हाध्यक्षा व महाराष्ट्र राज्य महिला सल्लागार, रक्ताचं नातं ट्रस्ट सदस्या , तक्षशिला अनाथ आश्रम संचालिका, पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महिला सरचिटणीस , महिलांना स्वावलंबनासाठी कमवा आणि शिका यासाठी घरगुतीव्यवसाय प्रशिक्षण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 129 सायकल न येणाऱ्या महिलांना मोफत टू व्हीलर ड्रायव्हिंग शिकविले ,रक्तदान क्षेत्रात भरीव कार्य करून स्वतः त्यांनी 98 वेळा रक्तदान करून एक नवा आदर्श महिला व समाजापुढे उभा केला आहे सध्या त्या फोर स्टेज कॅन्सरशी झुंज देत आहेत आणि त्यानंतर त्यांना आदिवासी भागात जाऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा कार्य पुढे चालू ठेवायचे आहे त्याचबरोबर पर्यावरण, रक्तदान व अवयव दान या क्षेत्रात भरीव काम करायचे आहे सर्व क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये नॅशनल इंटरनॅशनल स्थानिक असे सर्व स्तरावर एकूण 500 अधिक बक्षिसे व पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत स्काऊट गाईड क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा वाखडण्यासारखे आहे त्यांनी स्वतः दिल्ली आग्रा कलकत्ता उत्तरांचल छत्तीसगड नागपूर लंडन जपान स्वीडन कोरिया या ठिकाणी जाऊन स्काऊट गाईड क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांनी स्वतः 98 वेळा रक्तदान करून , नेत्रदान व देहदानाचा फॉर्म भरलेला आहे अनेक सेवाभावी संस्थांमध्ये त्यांचे कार्य व खाण्यासारखे आहे.अशा या अष्टपैलू विद्यार्थी प्रिय ,समाजप्रिय व्यक्तिमत्त्वाचा श्री जैन विद्या प्रसारक मंडळातील ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान राजेंद्रजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिलकुमारजी कांकरिया , प्राचार्या सौ सुनीता नवले. उपप्राचार्य श्रीअनिल गुंजाळ उपमुख्याध्यापिका सौ मनीषा जैन, पर्यवेक्षिका सौ मनीषा कलशेट्टी व पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळीया, श्री संजीव वाखारे सौ ताराबाई मुथा कन्या प्रशालेच्या प्राचार्या सौ सारंगा भारती, श्री गुरु गणेश विद्यालयाचे प्राचार्य श्री हनुमंत मारकड व श्रीमती गेंदीबाई चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री विवेक काळे, श्री गुरु गणेश प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ योगिता भेगडे, श्री बाठीया प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा मुसळे पुणे जिल्हा भारत स्काऊट संघटक श्री दिगंबर करंडे , राज्य गाईड श्रीम. शोभना जाधव, मा. एसीपी श्री ज्ञानेश्वर आरगडे व मा.एसीपी सौ विजया कारंडे , इंद्रायणी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक श्री एस बी चांडक संस्थापक, इसीएचे संस्थापिका अध्यक्षा सौ विनीता दाते, म न पा च्या सर्व पर्यवेक्षिका व माजी मुख्याध्यापिका, नक्षत्राचे देणं काव्य मंचाचे अध्यक्ष व संस्थापक श्री राजेंद्र सोनवणे, रक्ताचे नाते ट्रस्टचे संस्थापक श्री राम बांगड , जनकल्याण प्रतिष्ठान व सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक श्री सुरेश संकपाळ , मसापाध्यक्ष पीसीएमसीराजन लागे, पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारतचे संस्थापक श्री देवा तांबे, जयवंत भोईर प्रशालेच्या मुख्याध्यापिका वंदना सावंत, जिल्हा शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका योगिता काळे.जनता सहकारी बँकेचे मॅनेजर श्री महेंद्र देशपांडे व मा अविनाश खेडकर व पोलीस मित्र तनपुरे फाउंडेशनचे संस्थापक अशोक तनपुरे , श्री राजू शिवथरे,माजी नगरसेवक श्री आनंद कोराळे श्री राजेंद्र गावडे व श्रीम.अश्विनीताई चिंचवडे संस्थेचे समन्वयक श्री सतीश भारती, व संस्थेच्या वस्तीगृहाचे गृहपती महावीर जैन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांकडून, सर्व विभागांकडून , अनेक क्षेत्रातील सर्व मान्यवरांकडून सर्व शिक्षक बांधव व भगिनीकडून , विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे/पाचारणे यांना उर्वरित भावी निरोगी आयुष्यासाठी व पुढील कार्यासाठी सस्नेह शुभेच्छा देण्यात आल्या असा हा उत्साही, भावपूर्ण वातावरणामध्ये एक आगळा वेगळा सेवापुर्ती समारंभ साजरा झाला या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका श्रीम.मनिषा कलशेट्टी, सौ.स्मिता सोनवणे व सौ वंदना पाटील यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!