शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील प्राध्यापक राजेश सस्ते व अर्चना सस्ते यांना नवरात्र उत्सवानिमित्त महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती करण्याचा मान मिळाला, याबद्दल राजेश सस्ते यांनी महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन चे आभार व्यक्त केले.
तसेच मोशी परिसरातील नवदुर्गा महिला मंडळ आदर्श नगर येथे प्राध्यापक राजेश सस्ते व सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई राजेश सस्ते यांना दुर्गा मातेच्या आरतीचा मान मिळाला याचबरोबर मोशी, चर्होली डुडुळगाव, गंधर्व नगरी या परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त प्राध्यापक राजेश सस्ते व अर्चनाताई राजेशस्ते यांना आरतीचा मान दिला गेला याबद्दल या सस्ते दांपत्य यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले, तसेच झंकार मित्र मंडळ शिवाजी वाडी मोशी यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त देवीची आरती करण्याचा मान सस्ते उभयतांना दिला गेला याबद्दलही झंकार मित्र मंडळ शिवाजी वाडी यांचे राजेश सस्ते यांनी आभार व्यक्त केले.











