शबनम न्यूज | प्रतिनिधी
कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात शारदीय नवरात्र उत्सव दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे या शारदोत्सवानिमित्त गरबा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागा अंतर्गत प्रा.वर्षा निगाडे यांच्या पुढाकाराने व सर्व प्राध्यापकांच्या मदतीने ‘गरभा नृत्य स्पर्धा’अतिशय उत्साहात पार पडल्या. महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळपासूनच उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात देवी पूजा व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकरावी मधील आसावरी गुडदे हीने महिषासूर मर्दिनी स्तोत्र सादर केले.
या उत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांची उधळण केली. गरबा व दांडिया नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला अधिकच आकर्षक रंगत आणली.
इयत्ता अकरावी व बारावी वर्गानुसार गट पाडले होते त्यानुसार प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मि.शुभम परदेशी यांनी स्पर्धेचं परीक्षण केले. एकूण चौदा गटातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले.
प्रथम क्रमांक- अकरावी वाणिज्य क, द्वितीय क्रमांक – अकरावी वाणिज्य ड, व तृतीय क्रमांक अकरावी विज्ञान इ यांना विजयचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच युगुल (ड्यूएट) नृत्याचेही वेगळी पारितोषिके देण्यात आली त्यामध्ये बारावी वाणिज्य अ मधून आर्यन चौहान व श्रद्धा त्रिभुवन याना प्रथम पारितोषिक तर द्वितीय पारितोषिक खुशी शेट्टी व वेदिका कदम या जोडीला यांना या जोडीला मिळाले. अशा प्रकारे विजयचिन्ह स्वरूपात पारितोषिके देऊन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. याबरोबरच सर्व तृत्यांमधून विशेष भावाविष्कार सादर करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे जाहीर केली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ दीपकजी शहा, खजिनदार डॉ भूपाली शहा, संचालक डॉ तेजल शहा, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावी विज्ञान शाखेच्या स्वरा तापकीर आणि ईश्वरी चव्हाण यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.वर्षा निगडे यांनी केले.