शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिखली येथील एका मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग कंपनीचे प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या प्लेट्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२७) सकाळी सोनवणेवस्ती येथील युनिक ग्रुप कंपनीत घडली. चिखली पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.
चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपकुमार महावीरप्रसाद बाजिया (वय ३४, चिखली) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मुकेश विजय सिंग (वय २८, सोनवणे वस्ती, चिखली), बिटु कुमार सुरेश (वय २०, सोनवणे वस्ती, चिखली), नसिम अब्दुल करिम साह (वय २०), समिउल्ला साह फैजुलउल्ला साह (वय २६), मोहम्मद नसिम नुरमहम्मद साह (वय २३, मुळशी) यांना अटक केली आहे. फिर्यादी यांच्या युनिक ग्रुप मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग कंपनीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने उघडून कंपनीमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी कंपनीतून एकूण एक लाख ५३ हजार ९९० रुपये किमतीच्या अॅल्युमिनियमच्या प्लेट्स चोरून नेल्या. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.