spot_img
spot_img
spot_img

शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत राजमाता जिजाऊ मुलींच्या संघाला सलग दहाव्यांदा विजेतेपद

शबनम न्यूज | प्रतिनिधी
कै.तानाजी लांडगे क्रीडा संकुल कासारवाडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत  राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात शिवभूमी जुनियर कॉलेज निगडी या संघाचा 48-26अशा 22 गुणांच्या फरकाने पराभव करत सलग दहाव्यांदा विजेतेपद संपादन केलेले आहे. उपांत्य फेरीत फत्तेचंद जैन ज्युनिअर कॉलेज चिंचवड संघाला एकतर्फी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
सदर संघातील  कु.ज्ञानेश्वरी लांडे, कु.पलक मिसाळ कु.सरस्वती शिवमोरे यांनी आक्रमक चढाया करत तसेच कु. विद्या गायकवाड कु.अंजली पोळ, कु. डिंपल उडानशिवे  यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. सदर संघात नंदिनी साधू, भारती किरवे, साक्षी बाठे, स्वराली मांजरे, प्राजक्ता केदारी, तृप्ती जोरी या सर्व खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंची शालेय विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
        या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!