पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजोग वाघेरे यांनी आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काही दिवसापासून संजोग वाघेरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा शहरात होत होत्या याबाबत प्रश्न विचारल्या नंतर प्रसार माध्यमांना सांगताना संजोग वाघेरे यांनी सांगितले की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहूनच आगामी आपली राजकीय वाटचाल करणार असून आता आपण इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही तर आगामी महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावर लढविणार असल्याचे भाष्य संजोग वाघेरे यांनी केले.
अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे माजी महापौर तथा राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष राहिलेले संजोग वाघेरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते , त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढविण्यासाठी काम सुरू केले व आगामी महानगरपालिका निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. व याबाबत पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही कळविण्यात आले असल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले आहे.