spot_img
spot_img
spot_img

खेळाडू दत्तक योजनेतील विद्यार्थ्यांना ७४ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीची मंजुरी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने खेळाडू दत्तक योजना राबविण्यात येते. शहरातील खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात नाव कमवावे, शहरात नवीन खेळाडू घडावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महानगरपालिका ही योजना राबवत आहे. याच अनुषंगाने दत्तक योजना अंतर्गत २०२२-२३ मध्ये प्राप्त अर्जांची छाननी करून ४४ पात्र विद्यार्थी खेळाडूंना प्रत्यक्ष लाभ देण्यास क्रीडा विभागाच्या लेखा शिर्षातून ७४ लाख रुपयांच्या खर्चास आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे खेळाडू भविष्यात नक्कीच पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावतील असा विश्वास देखील आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला.

या बैठकीस अतिरिक्त विजयकुमार खोराटे, सह आयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत व्हिएतनाम येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलेले कु. प्रगती विनोद गायकवाड या खेळाडूस शिष्यवृत्ती अदा करणे, खेळाडू दत्तक योजने अंतर्गत सन २०२२-२३ मधील. पात्र विद्यार्थी खेळाडूंना २०२५-२६ ते २०२६-२७ या प्रत्यक्ष आर्थिक वर्षांमध्ये प्रत्यक्ष लाभ देणे व त्याकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देणे, शासकीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ आयोजित करणे व त्यासाठी. येणाऱ्या खर्चास मान्यता देणे, घरोघरी तिरंगा २०२५ उपक्रमांतर्गत आवश्यक राष्ट्रध्वज खरेदी करणे, कर्णबधिर मुलांच्या स्पीच थेरपीद्वारे सुविधा. विभागास मुदतवाढ देणे व त्यानुसार संबंधित. संस्थेस मानधन. अदा करणे, मनपाच्या विविध पंप हाऊसचे चालन करणे (२२-२३) कामाकारिता तरतूद वर्गीकरणास महापालिका सभेच्या. अधिकारंतर्गत मा. प्रशासक यांची मान्यता घेणेकामी शिफारस करणे, फ क्षेत्रीय कार्यालयच्या प्रभाग क्र. १ मध्ये पाणी पुरवठ्याचे विविध कामांतर्गत केलेले चर, खड्डे हॉट मिक्स पद्धतीने दुरुस्ती करणे, फ क्षेत्रीय कार्यालयच्या कार्य क्षेत्रातील प्रभाग क्र. ११, १२ व १३ मधील औष्णिक धुरीकरणासाठी रिक्षा टेम्पो/वाहन इंधनासह प्रतिदिन भाड्याने घेणे कामाचे द्वितीय मुदत वाढीबाबत कामाच्या खर्चास मान्यता देणे, प्रभाग १३ निगडी गावठाण येथील स्पाईन रोड परिसरातील विविध ठिकाणी रस्त्याचे हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, मनपाच्या १४ मेगावॅट वेस्ट टू एनर्जी मोशी प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या मनपाच्या विविध आस्थापना मध्ये समायोजन करण्यासाठी एच. टी. विजग्राहक यांना ओपन एक्सेस द्वारे जोडणीचे कामाकरिता म. रा. वि. वि. कं. लि. यांस विजपर्यवेक्षण शुल्क व इतर खर्च अदा करणे, ग क्षेत्रीय कार्यालयच्या प्रभाग २१ मधील सार्वजनिक शौचालयाचे व मुतऱ्यांची यांत्रिक पद्धतीने दैनंदिन साफसफाई व देखभाल दुरुस्ती कामास मुदत वाढ देणे, प्रभाग क्र. १६ किवळे भागातील कातळे वस्ती येथील उर्वरित १८. ०० मी. रुंदीपैकी ९. ० मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे, या प्रकल्पच्या कामाकरिता सल्लागार नेमणूक करणे, तसेच शिंदे वस्ती पाईपलाईन रस्ता विकसित करणे या प्रकल्पाच्या कामाकरिता सल्लागार नेमणूक करणे, ह क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रातील नवी दिशा योजने अंतर्गत मनपाचे सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचे स्वच्छता व देखभाल दुरुस्तीचे कामकाज थेट पद्धतीने देण्यात आलेल्या कामास मुदतवाढ देणे यासह विविध…..विषयांना मान्यता देण्यात आली.

याशिवाय प्रभाग क्र. २ कुदळवाडी परिसरातील डी पी रस्ते विकसित करण्याकरिता चालू विकास कामांचे सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देणे, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील प्राधिकरणाकडून मनपाच्या ताब्यात आलेल्या ४९ गाळे व टॉयलेट ब्लॉक्सची दुरुस्ती व इतर अनुषंगीक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास व नवीन उपलेखाशीर्ष तयार करण्यास मान्यता देणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस लागून असलेल्या मंजूर विकास योजनेतील भूमकर चौक वाकड येथील ताथवडे हद्दीपर्यंत १८ मी. रस्त्याने बाधित होणारे २६ सीट्स चे सुलभ शौचालय निष्कासित करण्यात मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!