पिंपरी चिंचवड शहरात संगीतमय कार्यक्रम अनेक होत असतात, परंतु लक्षात राहण्यासारखे व वारंवार अशा कार्यक्रमांना हजेरी लावावी असे सहज आपल्याला आकर्षित करणारे कार्यक्रम क्वचितच होत असतात, असाच एक भव्य दिव्य संगीतमय कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात संपन्न झाला. स्वर रजनी म्युझिकल ग्रुप प्रस्तुत नवरात्र विशेष कराओके सिंगिंग चा कार्यक्रम 28 सप्टेंबर रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण, निगडी येथे मोठ्या दिमाखात पार पडला हा कार्यक्रम श्रोत्यांनी हाउसफुल केला.
स्वर रजनी म्युझिकल ग्रुप वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सिंगिंग कार्यक्रमांमध्ये गोंधळी गीते, जागरण गीते, भारुड गीते, जोगवा गीते आणि दांडिया स्पेशल गीते आणि नवरात्री स्पेशल गीत उत्कृष्ट व प्रसिद्ध गायकांच्या वतीने सादर करण्यात आले.
सर्व गाणे गायक कलाकारांनी अतिशय उत्तमरीत्या गायली, यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक महीपत वर्पे यांच्यासह विजय सांबरे , अरुण सरमाने, चंद्रकांत हिवरकर, मधुकर बिडकर, सतीश कापडी, मंगला कदम, शुभांगी पवार, नेहा गायकवाड यांनी आपापली गाणी उत्तम प्रकारे सादर केली, तर या गाण्यांवर अनिशा सावंत, ऋतुजा पाटील यांनी नृत्य सादर केले. या संगीतमय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक अरुण सरमाने यांनी व नृत्यांगना ऋतुजा पाटील यांनी केले.
या संगीतमय कार्यक्रमाची टेक्निकल टीम व्हिडिओ, व्युजवल विक्रम अंबिके यांनी तर साऊंड राजेंद्र देसाई आणि फोटोग्राफी आकाश गाजूल यांनी आपापली जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली.
या मनोरंजक संगीतमय कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माउंट आबू राजस्थान येथून आलेले बि.के. हरीश भाई, सामाजिक कार्यकर्त्या विमल ताई टाके, प्रथमेश डोईफोडे, गजानन सावंत, विलास गाधडे , नंदकुमार कांबळे, सचिन शेटे, राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, हा कार्यक्रम प्रेक्षकांनी हाउसफुल केला या कार्यक्रमाच्या शेवटी या कार्यक्रमाचे आयोजक महिपत वर्पे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.