spot_img
spot_img
spot_img

जिल्ह्यात क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय

शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे घनकचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून स्थानिक स्तरावर त्याचे व्यवस्थापन करणे कठीण होत आहे. गावस्तरावर प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने, एकत्रित क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या अनुषंगाने आज महात्मा गांधी सभागृह, जिल्हा परिषद पुणे येथे बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती शालिनी कडू प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा),  व्यंकटेश दुर्वास सहआयुक्त नगरपालिका शाखा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, अनिल दौंडे उपविभागीय अधिकारी, खेड, नितीन गवळी प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी चाकण,भूषण जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अप्पासाहेब गुजर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी-स्वच्छता विभाग, विशाल शिंदे गटविकास अधिकारी, पंचायत समिती खेड, अंकुश जाधव मुख्याधिकारी नगरपालिका चाकण, भांडगे कार्यकारी अभियंता, एमआयडीसी चाकण तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत चाकण नगरपालिका व एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायती म्हणजे कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरळी-खराबवाडी, खालुम्ब्रे, म्हाळुंगे, निगोजे, मोई तसेच आंबेठाण या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे.
बैठकी दरम्यान प्रकल्पासाठी जागा उपलब्धता, अपेक्षित खर्च तसेच गावनिहाय निर्माण होणारा दररोजचा घनकचरा याबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या एकत्रित सहभागातून क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी पुढील कार्यवाहीचे सविस्तर नियोजन करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!