शबनम न्यूज | प्रतिनिधी
२७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत आयोजित म्युझिकल तंबोला (हाऊजी) स्पर्धेला महिलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला. सुरेल गाण्यांच्या साथीने खेळलेली ही स्पर्धा केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, महिलांना आनंद, मैत्री आणि स्नेहबंध दृढ करण्याची संधी ठरली.
ही स्पर्धा पुण्यातील सुप्रसिद्ध गायिका आरती दीक्षित आणि आकाश सोळंकी यांच्या मधुर गायनाने घेण्यात आली. त्यांच्या गायनामुळे वातावरण अधिकच रंगतदार व सुरेल झाले.
शिवदर्शन–सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात झालेल्या या स्पर्धा कार्यक्रमात प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर सामूहिक आरती झल्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला. यामध्ये २००हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
स्पर्धेत विजयी ठरलेल्या महिला पुढीलप्रमाणे –
1st Row – रतन मोरे
2nd Row – नंदा भट्टड
3rd Row – शकुंतला सिकची
4 Corner – सुप्रिया पुरोहित
1st Five Songs – दीपाली घाटे
Full हाऊजी – वर्षा बेंद्रे
विजेत्या महिलांचा सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमामुळे महोत्सवात उत्साह, हास्य आणि आनंदाची रंगत भरली. महिलांच्या जोशपूर्ण सहभागामुळे वातावरणात खऱ्या अर्थाने नवरात्रीचा उत्सव रंग चढला.
याप्रसंगी श्रुतिका बागुल, वृषाली बागुल आणि वैष्णवी वाघोलीकर यांची विशेष उपस्थिती होती.