शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना विभाग संघटिका सौ सुजाता हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना काळेवाडी रहाटणी विभाग वतीने प्रभाग क्रमांक 22 मधील महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम (दि. 3 )ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये नवरात्रीचे नऊ रंग बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या खेळ पैठणीचा कार्यक्रमात विजेत्या महिलांसाठी विविध स्वरूपाचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रसिद्ध निवेदक अक्षय मोरे प्रस्तुत करणार आहेत.
3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता आरंभ बँक्वेट हॉल, भोईर लोन बीआरटी रोड, विजयनगर काळेवाडी येथे हा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख हरीश उर्फ आबा नखाते यांनी केले आहे.