spot_img
spot_img
spot_img

एकत्र लढणं शक्य नाही, स्थानिक निवडणुकांचे निर्णय जिल्हा पातळीवर – प्रफुल्ल पटेल

राज्य आणि देश पातळीवरच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू – पटेल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्थानिक संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पाडणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली आहे. यावेळी बोलताना ‘एकत्र लढणं प्रत्येक वेळेस शक्य नाही, स्थानिक निवडणुकांची निर्णय जिल्हा पातळीवर होईल’, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. ते गोंदियात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, राज्यसभा व लोकसभा निवडणुका महायुती व एनडीए एकत्र लढवणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवारी व जागावाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात येतील, जेणेकरून कार्यकर्त्यांच्या आकांक्षांना न्याय देता येईल.

पूरस्थितीबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला असून केंद्र सरकारकडे अहवाल सादर करून मदतीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार-खासदारांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे.

विरोधकांच्या टीका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाचा भाग असल्याचे म्हटले प्रफुल पटेल म्हणाले. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचेही प्रफुल पटेल म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!