शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर जयंती व्याख्यानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, नारायणगाव उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अॅड्. राम कांडगे उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी भूषविले.
मा. दत्तात्रय गायकवाड, मा. महापौर, पुणे महानगरपालिका व सदस्य सीडीसी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध – पुणे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले, या महाविद्यालयाचे मा. प्राचार्य,डॉ. अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय घौडदौड करत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे स्वरूप आगळे वेगळे असेच आहे.
प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी मार्गदर्शन करताना म्हणाले, कर्मवीरांचे कार्य हिमालयापेक्षा उतुंग आहे. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी काही नियम घालून दिले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली कामे स्वतः करावीत. स्वावलंबनाणे जगावे. प्रत्येकाने श्रमाला प्रतिष्ठा द्यावी. वेळेवर पहाटे ४.३० ला उठावे, वेळेवर अभ्यास करावा, रात्री १०.३० ला झोपावे. काटेकोर शिस्त पाळावी. जगातील महान माणसं सारखाच विचार करतात आणि सारखेच जीवन जगतात. आण्णांनी वसतिगृहसाठी जे दहा नियम केले होते ते जर आपण आचरणात आणले तर आपलेही जीवन बदलून जाईल.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. अॅड्. राम कांडगे म्हणाले,कर्मवीर आण्णांनी सर्वोत्तम मानवतावाद जीवनात आणला. महाराष्ट्र धर्म खऱ्या अर्थाने जगवला आणि जागवला. कर्मवीर ही पदवी आण्णांना गाडगे महाराजांनी दिली. महाराष्ट्राची परंपरा ही संतांची, शूरांची,समाजसुधारकांची आणि बुद्धीवंतानची आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्य, डॉ. अरुण आंधळे यांनी केले. आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रो. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन IQAC समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता पाटील यांनी केले. यावेळी मा. दत्तात्रय गायकवाड, विभागीय अधिकारी (पश्चिम विभाग), रयत शिक्षण संस्था, सातारा तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक उपस्थित होते.