शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांच्या बलिदानाने आणि त्यागाने देशाला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले,थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि प्रखर देशभक्ती ही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दापोडी चौकातील पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.