शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिताताई संदीप काटे यांच्या पुढाकाराने पिंपळे सौदागर येथे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे, संदेश काटे, मनोज ब्राह्मणकर तसेच पिंपळे सौदागरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या महोत्सवाला पहिल्याच दिवशी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.पुढील दोन दिवस हा महोत्सव पिंपळे सौदागरकरांसाठी आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक जल्लोष घेऊन येणार आहे.
या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सौ अनिता संदीप काटे यांच्यावतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्यांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येत आहेत या नवरात्र उत्सवाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.