शबनम न्यूज , प्रतिनिधी :
महाराष्ट्रात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे ,मराठवाड्यात अतिवृष्टी व महापूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंब अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले, या मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या पुढाकाराने, साईनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मोशी परिसरात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. वसंत बोराटे यांच्या या आवाहन मोशी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.
स्प्रिंग गार्डन्स सोसायटीसह विविध सोसायटीमधील रहिवाशांनी अन्नधान्याचे किट साईनाथ सोशल फाउंडेशन कडे सुपूर्द केले आहे. आतापर्यंत साधारणपणे एक टेम्पो भर मदत सामग्री जमा झाली असल्याची माहिती सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच लवकरच पूर परिस्थितीचा आढावा घेऊन ही मदत पूरग्रस्त बांधवांसाठी पोहोचण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीकरिता केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने वसंत बोराटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे तसेच पूरग्रस्तांसाठी ही मदत लवकरात लवकर पूरग्रस्त नागरिकांसाठी पर्यंत पोहोचण्यासाठी साईनाथ सोशल फाउंडेशन च्या वतीने तत्परता दाखविण्यात आल्याने अनेक नागरिकांनी वसंत बोराटे यांचेही आभार व्यक्त केले