शबनम न्यूज | प्रतिनिधी
शुक्रवार दि. २६/०९/२०२५ रोजी महावितरण भोसरी कार्यालयात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी यांचे सोबत दर महिन्याची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ, सचिन आदक, उद्योजक व मा. नगसेवक संजय वाबळे तसेच महावितरणचे मुख्य अभियंता सिंहाजीराव गायकवाड, भोसरी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर, सहाय्यक अभियंता माने, जाधव, भगत, हे उपस्थित होते.
महावितरणच्या होणाऱ्या सबस्टेशन पैकी कॅनबे चौक तळवडे येथे अॅप्रूव्हल आले की त्याचे काम चालू होणार आहे.
औद्योगिक परिसरात गरजेनुसार लागणाऱ्या केबल बदलण्याचे काम चालू आहे.
सेक्टर ७ आणि १० येथे सबस्टेशनसाठी या दोन्ही सेक्टरमधील फॅसेलिटी सेंटरसाठी असलेल्या जागेपैकी दोन्ही ठिकाणांसाठी प्रत्येकी १००० स्वे. मी. ही पी. एम. आर. डी. ए. कडून घेण्याचे मान्य करण्यात आले.
शांतीनगर भोसरी येथे नाल्याच्या शेजारी दोन ठिकाणी २०० चे दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे
गायकवाड साहेबांनी निर्देश दिले.
तळवडे, ज्योतिबानगर, सोनवणे वस्ती, शेलारवस्ती या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणचा देखील विचार केला जाईल असे सांगण्यात आले.
विजेचे साहित्य वेळेवर उपलब्ध केले जाईल असे आश्वासन देण्यात आले.
झाडांच्या फांद्या वेळेवर कट करून अखंड वीज पुरवठा चालू ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले.
डी. पी. बॉक्सची झाकणे ज्या ठिकाणी नसतील त्या ठिकाणी नवीन झाकणे बसवली जातील.
दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी अशीच आढावा बैठक संघटनेबरोबर घेतली जाईल असे गायकवडसाहेब यांनी सांगितले.