शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर ऊर्फ ओ.पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ३१ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात ओ.पी. नय्यर यांची अजरामर गाणी सादर करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. १९५०-६० या दशकात ओ.पी. नय्यर यांनी हिंदी चित्रपट गीतांचे सुवर्णयुग निर्माण केले. अतिशय वेगवान व लयबद्धन गाणी हे त्यांचे वैशिष्टे होते अशा भावना व्यक्त करीत ओ.पी. नय्यर यांनी संगीत दिलेली काही निवडक गाणी रसिकांसमोर सादर करण्यात आली. त्यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून संयोजक आबा बागुल व गायकांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे सुप्रसिध्द “मांग के साथ तुम्हारा…” आणि ” ये चांद सा रोशन चेहरा” ही गाणी गायिका पल्लवी पत्की ढोले आणि गायक रफि हबीब यांनी गायिली तेव्हा प्रेक्षकांनी ‘वन्समोअर’चा नारा देत टाळ्यांचा कडकडात केला.
यानंतर ‘म्युझिकल मास्टर्स’ हा कार्यक्रम संपन्न झाला. ‘म्युझिकल मास्टर्स’ या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना संजय हिवराळे आणि पल्लवी पत्की-ढोले यांची होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नामांकित संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली लोकप्रिय गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली. यावेळी गायक रफी हबीब, विनोद कुमार, आकाश सोळंकी, भाग्यश्री डुंबरे कोरस स्वरनव्य यांनी विविध गाणी सुरेल संगीताच्या माध्यमातून सादर करत रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात म्युझिकल वादनाने झाली. त्यानंतर ‘है नाम रे..’, “एक लडकी को देखा तो..’, ‘दर्द-ए-दिल..’, ‘सोला बरस की..’ अशी अजरामर झालेली गाणी गाण्यात आली. पल्लवी पत्की यांनी गायलेल्या ‘प्यार करने वाले’ गाण्याला तर रसिकांनी वन्समोअर म्हणत कलाकार आणि वादकांचा उत्साह आणखी वाढवला. ‘गुलाबी आँखें..’ या सॅक्सोफोनवरील गाण्याचे शब्द ऐकून प्रेक्षकांनी देखील गाणे एकत्रित रित्या गुणगुण्यास सुरुवात केली. त्यानंतर जल्लोषपूर्ण उत्साहात ‘हवा हवाई..’, ‘इलू..इलू..’, ‘जो तुम चाहे जहाँ..’, ‘जुम्मा चुम्मा दे दे..’ या एकामागूनएक गाण्यांनी तर रसिकांमध्ये उत्साह भरून ते सभागृहात खुर्चीवरुन उठून चक्क हात हवेत उंचावून नाचू लागत टाळयांनी कलाकरांना साथ देत होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रा. महेश अचिंतलवार यांनी करत कार्यक्रमात रंगत आणली. गायक आणि गायिकांना या कार्यक्रमा दरम्यान वादक मिहिर भदकामकर, अमृता ठाकूर-देसाई, अभिजीत भदे, संजय हिरवळे, विलास रायकर, सचिन वाघमारे, महेंद्र कुमार,अंकुश बोरडे, संकेत देहाडे, रोहित साने यांनी उत्कृष्ट साथ दिली.
याप्रसंगी जयश्री बागुल, किशोर सरपोतदार, नरेंद्र बिरार,अनिल टाकळकर, अनिल बिरार, घनश्याम सावंत , लक्ष्मण आरडे, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, सागर बागुल उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमात उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शीतल कोरे यांचा यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.