spot_img
spot_img
spot_img

PCMC लेखा विभागातील गैरकारभाराची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे !

सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हाटकर यांनी केली तक्रार

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील गैरव्यवहारा प्रकरणी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हाटकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील लेखा विभागातील कर्मचारी यांच्या त्वरित बदल्या करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात यावे अशी मागणी आपल्या तक्रारीत राहुल कोल्हाटकर यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील गैर व्यवहार व अनेक वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत असणारे अधिकारी, लिपिक, कर्मचारी, शिपाई यांच्याकडून होत असलेल्या शासकीय नियम डावलून पाच वर्षाहून अधिक काळ लेखा विभागात काम करणाऱ्या सर्व कर्मचारी जे पदोन्नतीने बदली होऊन सुद्धा एकाच ठिकाणी एकाच पदावर कारभार पाहत आहेत, अशा कर्मचारी यांच्या बदलीचे आदेश आयुक्तांना देण्यात यावे, तसेच मागील वेळी मुख्यमंत्री कार्यालयातून या तक्रारीबाबत योग्य ती चौकशी करण्याचे आदेश देऊन सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लेखा विभागातील कर्मचारी यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात यावे अशी मागणी राहुल कोल्हाटकर यांनी केली आहे.

राहुल कोल्हाटकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील कर्मचारी, अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत आठ ऑगस्ट रोजी ई-मेलच्या माध्यमातून तक्रार देण्यात आली होती. सदर तक्रारीची दाखल घेत मुख्यमंत्री कार्यालया वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु आजपर्यंत कोणत्याही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही त्यामुळे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह भ्रष्ट अधिकारी किंवा कर्मचारी यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप राहुल कोल्हाटकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील लेखा विभागात पैसे घेण्याबाबत जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याने प्रशासकीय राजवटीत कसे चुकीचे काम चालते हे अधोरेखित होते, अनेक वर्षापासून महापालिका लेखा विभागात अशाप्रमाणे अनेक गोष्टी घडत आहेत. लेखा विभागातील महिला कर्मचारी सुद्धा आर्थिक देवाण-घेवाण करतात, अनेक वर्षापासून अधिकारी, कर्मचारी, लिपिक एकाच ठिकाणी काम करत आहेत. काहींना पदोन्नती देऊनही ते एका जागेवर कसे काय काम करू शकतात ? तर काही बदली केलेले कर्मचारी यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा रुजू करण्यात आले. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, लिपिक, शिपाई एकात ठिकाणी अनेक वर्षापासून कायम असल्याने त्यांचे आणि ठेकेदार यांचे आर्थिक हितसंबंध तयार झाले अशा अनेक बाबी, अनेक चुकीच्या घटना या विभागात घडत आहेत या सर्व गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात यावे.महानगरपालिका च्या लेखा विभागातील सर्व गैरकारभाराची चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांना द्यावे अशी मागणी राहुल कोल्हाटकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!