शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवरात्र उत्सवानिमित्त सोमनाथ दादा तापकीर युवा मंच वतीने तसेच पिंपळे सौदागर येथील भाजप मंडल अध्यक्ष सोमनाथ मोहन तापकीर यांच्या पुढाकाराने ‘शारदीय नवरात्री उत्सव’ यामध्ये दांडिया, गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपन्न होत आहे. ही स्पर्धा तापकीर मळा, नानाश्री हॉटेल समोर, रहाटणी-काळेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेत दररोज लकी ड्रॉ द्वारे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार असून, सहभागी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी प्राप्त होत आहे. यामध्ये रोज एक सोन्याची नथ, दररोज तीन पैठणी तीन, चांदीचे बिछवे तसेच तीन आकर्षक बक्षिसे, ट्रॉफी, त्याच प्रमाणात लहान गटातील विजेत्यांना उत्कर्ष ड्रेपरी, लहान मुलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या दांडिया आणि गरबा नृत्य स्पर्धेत सहभागी विजेत्यांना बक्षीस मिळणार असून, जास्तीत जास्त महिला-भगिनी, नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा आणि मोलाची बक्षीस जिंकावी, असे आवाहन सोमनाथ तापकीर यांनी केले आहे.