spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिली नदी पात्रात बांधकाम परवानगी…

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी सर्वे नंबर १९०८ मधील काही भाग निळ्या पूररेषेमध्ये येतो. त्यामुळे त्या भूखंडावर बांधकाम परवानगी मिळू शकत नाही. मात्र या पूर रेषेतील भूखंडावर बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या UDCPR नियमानुसार पूररेषेत येणाऱ्या भूखंडावर बांधकाम परवानगी देता येत नाही. सदर परवानगी कशी काय देण्यात आली की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करून परवानगी दिली गेली आहे का  असा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे.

जुन्या चाळीच्या जागेवर ही परवानगी दिली असली तरी नियमानुसार ज्या बांधकामास कंप्लेक्शन मिळून ३० वर्षे पूर्ण झालेत अशा बांधकामास (रिडेव्हपेमेंटस्कीम द्वारे) परवानगी देता येते मात्र पूर्वीची कसलीही परवानगी नसताना आणि भूखंड पूररेषेत असतानाही या बांधकामास कशी काय परवानगी दिली अशी विचारणा होत आहे. या मुळे पूर रेषेमधील परवानगी दिलेल्या इमारतीमधील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.सदर परवानगी कोणाच्या दबाव खाली देण्यात आली आहे की परवानगी देताना काही  भ्रष्टाचार झाला आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.या बाबत ची चौकशी आवश्यक असल्याचे अनेकजण खाजगीत सांगत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!