शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे यांच्या यांच्या पुढाकाराने तसेच निलेश काटे युवा मंच आयोजित पिंपळे सौदागर येथे नवरात्र उत्सवानिमित्त ग्रँड दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त ‘रास गरबा आणि दांडिया 2025 ‘ या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार असून, सदर स्पर्धा 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजता सुरू करण्यात येणार असून सदर स्पर्धा चॅलेंजर पब्लिक स्कूल, शिवसाई कॉलनी, पिंपळे सौदागर येथे संपन्न होत आहे.
सदर स्पर्धेत सहभागी विजेत्यांना सौ अनिता ताई संदीप काटे व संदीप विठ्ठल काटे यांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिला, नागरिकांना सदर स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन निलेश काटे युवा मंच यांच्यावतीने करण्यात आले आहे.