spot_img
spot_img
spot_img

रस्ता दुभाजक व फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेचे व्यापक नियोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर हिरवेगार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांवर तसेच फुटपाथवर दर दहा मीटर अंतरावर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत झाडांच्या संरक्षणासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने झाडांची नियमित देखभालनिगा व जिओ-फेन्सिंगसह विविध उपाययोजना कशा पद्धतीने करण्यात येत आहेतयाचा आढावा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी घेतला.

ब आणि ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक व फुटपाथवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची प्रत्यक्ष पाहणी अतिरिक्त आयुक्तांनी केली. देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्याचा हाती घेतलेल्या उपक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाहीयाचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटेउद्यान अधीक्षक योगेश वाळुंजसहाय्यक उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावेउद्यान निरीक्षक दादा गोरडसहाय्यक उद्यान निरीक्षक ज्ञानोबा कांबळेउद्यान सहाय्यक प्रदीप गजरमल यांच्यासह उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी नेहरूनगरसंतोषी माता चौक ते यशवंत नगर चौकटेल्को रोडस्पाईन रोडदत्तु तात्या चिंचवडे चौकवाल्हेकर वाडी – ८० फुटी रस्ताबिर्ला हॉस्पिटल रोडचिंचवडकाळेवाडी बीआरटी रोडकावेरी नगरकसपटे वस्तीवाकड परिसरातील प्रमुख रस्ते अशा विविध भागांची पाहणी करत झाडांच्या देखरेखीबाबत व निगेबाबत विविध निर्देश दिले.

रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावताना दोन झाडांच्या मध्ये नियमापेक्षा जास्त गॅप ठेवू नयेझाडांची कटिंग एका रेषेत करावीझाडांभोवती प्लास्टिक वा कचरा दिसणार नाही याची काळजी घ्यावीझाडांच्या संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना बांबू ट्री गार्ड लावावेझाडांना नियमित पाणी द्यावेझाडांच्या मध्ये तन’ राहू नयेफांद्यांची छाटणी नियोजनबद्ध असावीअशा सूचना देतानाच रस्त्याच्या कडेला असणारे आयलंड्स स्वच्छ करून त्यांनाही हरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रस्ता दुभाजक व फुटपाथवर झालेल्या वृक्षारोपणाचा दर्जाझाडांची संख्या आणि जिओ-फेन्सिंग याबाबत त्यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी वारंवार सूचना देऊनही निर्देशांचे पालन न करणाऱ्या व कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने या कामाचा नियमित आढावा घ्यावाअसेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या देशी प्रजातींच्या वृक्षारोपण मोहिमेमुळे शहराच्या हरित आच्छादनात वाढ होईलप्रदूषण नियंत्रणात राहील व पर्यावरणस्नेही शहरनिर्मितीस मदत होईलअसा विश्वास अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केला.

शहीद अशोक कामटे उद्यानाला दिली भेट

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी वाकड परिसरातील शहीद अशोक कामटे उद्यानाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उद्यानातील खुले व्यासपीठसुरक्षाव्यवस्थास्वच्छतागृह आदींबाबत माहिती घेतली. येथील झाडांवर नियमित फवारणी करावीझाडांना नियमित पाणी द्यावेउद्यानात आवश्यकतेनुसार आणखी विद्युत दिवे बसवण्यात यावेतअशा विविध सूचनाही त्यांनी दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!