शबनम न्यूज , प्रतिनिधी : पिंपरी मधील साई चौक येथील कै. किंमतराम आसवानी भुयारी मार्ग वरील खड्डे तसेच परिसरात पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे नागरिकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
पिंपरी येथील डेरी फार्म इथला ब्रिज बंद असल्यामुळे सर्व वाहनांना पिंपरी अंडरग्राउंड मधून हायवे कडे जावे लागते, त्यामुळे येथे रहदारी प्रचंड प्रमाणात वाढली आणि त्यामुळेच रस्त्यावर जास्त खड्डे पडले हे रस्ते कॉंक्रिटीकरण करणे आवश्यक आहे ,परंतु सध्या सतत पाऊस पडत आहे आणि या सतत च्या पावसामुळे रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे सध्या तरी तरी शक्य नसल्याने माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या पुढाकाराने नागरिकांची समस्या मिटविण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना तात्पुरत्या स्वरूपात डांबरी प्याच मारून सर्व खड्डे बुजवण्यात आले. व सदर रस्ता रहदारीसाठी उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळे नागरिकांना आता वाहतुकीला सदर रस्ता चांगल्या प्रकारे उपलब्ध झाला आहे.
सदर काम पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू होते व लवकरच या ठिकाणी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डब्बू आसवानी यांनी दिली.