शबनम न्यूज , प्रतिनिधी : सध्या नवरात्र उत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे. नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात स्वराज्य जननी महिला मंडळ सस्तेवाडी येथे, तसेच अनुष्का सोसायटी महिला मंडळ येथे शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त प्राध्यापक राजेश सस्ते, व अर्चनाताई राजेश सस्ते यांना आरतीचा मान देण्यात आला. तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राध्यापक राजेश सस्ते यांनी स्वराज्य जननी महिला मंडळ सस्तेवाडी मोशी मधील सर्व मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच अनुष्का सोसायटी मधील महिला मंडळ यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.