शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने स्व. आण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
पिंपरी-चिंचवड (दि.25/09/2025) :अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी कामगारांचे भाग्यविधाते, माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी के. एस. बी. चौक, चिंचवड येथील स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असून आजही कामगार वर्गाच्या संघर्षाला दिशा देणारे आहे.”
या वेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, कार्याध्यक्ष परेश मोरे,जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, पांडुरंग कदम, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, पांडुरंग पठारे, अशोक साळुंखे, सतीश कंटाळे, गोरक्ष दुबाले, समर्थ नाईकवाडे, नागेश व्हनवटे, मनोज मंजाळ, अमित पासलकर,, बबन काळे, दादा कदम,उद्धव सरोदे,माऊली पाचपुते,अशोक साळुंखे, श्रीकांत मोरे, भारत मंजाळ,काळोखे मामा,विश्वनाथ गांगड,नाना नाईकवाडे,विजय खंडागळे, गिरीश देशमुख रतन भोजने,आयुष शिंदे, गणेश नाइकवाडे, भरत मंजाळ यांच्या सह सर्व पदाधिकारी, विविध माथाडी टोळ्यांचे मुकादम व मोठ्या संख्येने सभासद कामगार उपस्थित होते.