शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात संपन्न झाली. यात तिखट पदार्थ भागात कोथिंबीर वडी ,सुरळी वडी ,पाट वडी आणि आळू वडी व गोड भागात रबडी मालपुवा ,उपवास मोदक , लाल भोपळा बासुंदी ,मकाणा लाडू ,शिंगाडा नानकटाई ,उपवास धोंडस हे पदार्थ होते. २५० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धक महिलांनी सुंदर सजावट करीत तयार करून आणलेले पदार्थ मांडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरितास् किचनच्या सरिता पद्मन होत्या. परीक्षक म्हणून किशोर सरपोतदार आणि कोमल पारखे यांनी काम पाहिले.

पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – स्वाती पंडित द्वितीय क्रमांक – सीमा नलावडे तृतीय क्रमांक – विद्या ताम्हणकर उत्तेजनार्थ – १. दिपाली धस २. राजश्री सिद्धेश्वर ३. मनीषा जाळीन्द्रे. यांनी पटकावला. तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – पूनम परमार द्वितीय क्रमांक -शीतल भळकर तृतीय क्रमांक – पुण्या सोनी उत्तेजनार्थ – १.मंगला हंकारे ,२. वर्षा तन्ना . यांनी पटकावला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० असे बक्षिसाचे स्वरूप होते. या प्रसंगी छाया कातुरे , संगीता बागुल , प्राजक्ता ढवळे यांची विशेष उपस्थिती होती.








