spot_img
spot_img
spot_img

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान

पिंपरी चिंचवड मधील कमला एज्युकेशन सोसायटी प्रतिपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा ज्युनियर कॉलेजमधील गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम संस्थेची प्रामाणिक राहून गुणवत्ता मूर्तीसाठी केलेले साध्य पूर्ण प्रयत्न यांचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात प्राध्यापक रघुनाथ कामाने प्राध्यापिका सुरेखा कुंभार प्राध्यापिका तृप्ती बजाज तसेच वरिष्ठ लिपिक भूषण महाजन यांना स्मृतीचिन्ह देत सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वनिता कुऱ्हाडे संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक शहा खजिनदार डॉक्टर भोपाली शहा संचालिका डॉक्टर तेजल शहा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!