spot_img
spot_img
spot_img

नवरात्रोत्सवानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात साडेतीन शक्तीपीठांचा भव्य देखावा

पिंपरी , प्रतिनिधी : सौ. कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाउंडेशन व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरात साकारण्यात आला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा भव्य देखावा
नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री आणि नऊ दिवसाचे महत्वाचे व्रत आहे. देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन यावेळी घडते. भारतात एकूण ५१ शक्तिपीठे आहेत.

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. नवरात्रोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील साडेतीन शक्तींपीठांचे दर्शन सोहळा तुम्हाला पिंपरी चिंचवड मध्ये अनुभवता येणार आहे. महात्मा फुले नगर चिखली रोड वरील कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने भव्य दिव्य असा देखावा सादर करण्यात आलेला आहे.

यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी माता, माहूरची श्री रेणुकादेवी, सप्तशृंगी माता असं देखणं शक्तीपीठ व दर्शनासाठी बनवलेला आहे. सर्व देवी भक्तांनी साडेतीन पीठ यांच्या दर्शनासाठी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजिका सौ. कीर्ती मारुती जाधव यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!