शबनम न्यूज , रहाटणी ,प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे या सेवा पंधरवडा अभियानांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून रहाटणी परिसरातील भाजपाचे युवा नेते देविदास आप्पा तांबे यांच्या पुढाकाराने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरा अंतर्गत विविध आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिरात रहाटणी परिसरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद पहावयास मिळाला. या शिबिरा अंतर्गत विविध आरोग्य तपासणी मोफत करण्यात आल्या.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देविदास आप्पा तांबे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे देविदास आप्पा तांबे हे मागील अनेक वर्षापासून आपल्या सरपंच फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत आले आहेत एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून त्यांनी रहाटणी परिसरात आपली ओळख निर्माण केली आहे.