शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नुकतेच जनसंवाद कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील अनेक समस्या जाणून घेतल्या व बहुतांश समस्यांचे निराकरण केले तसेच पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या वतीने परिवार मिलनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड शहर आणि अजित पवार यांचे नाते मागील तीन दशकापासून अबाधित आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा विकास फक्त अजित पवार यांच्या विजनरी नेतृत्वाचे प्रतीक आहे.
याच शहरात परिवार मिलन हा कार्यक्रम अजित पवार यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. पिंपरी चिंचवड शहरवासीय हे अजित पवार यांचा परिवार आहे. पिंपरी येथे अडवाणी धर्मशाळा येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी अजित पवार यांच्या सोबत संवाद साधला. तसेच आपल्या समस्या मांडल्या आणि अजित पवार यांनी देखील नेहमीप्रमाणे आपल्या नेहमीच्या शैलीत सर्वांचे समस्या ऐकून घेऊन या समस्यांचे निराकरण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.