spot_img
spot_img
spot_img

घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक ; २५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वतीने सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच सांगवी, दापोडी व भोसरी हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एकूण २५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय ३८, रा. शेटे मळा, श्री मुक्ताई कॉम्प्लेक्स नारायणगाव, ता.जुन्नर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून सांगवी पोलिसांनी जयवंत याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयवंत याला अटक करून तपासादरम्यान त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. तसेच सांगवी, दापोडी व भोसरी या परिसरात देखील घर फोडी केल्याचे कबूल करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुमारे सहा गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले असून यापूर्वी देखील त्याच्या विरोधात ४४ गुन्हे दाखल असून १०३ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

यामध्ये सांगवी विश्रामबाग, सहकार नगर, भारती विद्यापीठ, हडपसर, बिबेवाडी, चतुर्श्रुंगी, बंडगार्डन, शिवाजीनगर, दत्तवाडी, कोथरूड, खडक, भोसरी, निगडी, येरवडा, खडकी, कोंढवा या हद्दीतील गुन्हे आरोपीवर दाखल आहे. घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या विरोधात चौकशी सुरू असून याबाबतचा तपास सांगवी पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त परिमंडल १ चे संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग अमोल नांदेकर, सह पोलीस निरीक्षक युवराज कलकुटके, चक्रधर ताकभाते, रोहित पाटील, सुरेश हिंगे, शशिकांत वाघोले, प्रकाश शिंदे, शैलेश काळभोर, सचिन ढवळे, निशांत काळे, प्रमोद गोडे, शैलेश मगर, आशिष बनकर, सचिन तुपे, विजय पाटील, आकाश खंडागळे यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!