spot_img
spot_img
spot_img

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला “इंडियन स्कूल एक्सलन्स अवॉर्ड” प्रदान !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजला शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल “इंडियन स्कूल एक्सलन्स अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. तन्मय पब्लिकेशन आणि सप्तरंग सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजाशी असलेले योगदान या निकषांवर हा पुरस्कार दिला जातो. या सन्मानामुळे प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रातील नेतृत्व भूमिका अधिक बळकट झाली आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुन्हाडे म्हणाल्या, “हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संस्थेबरोबर संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांचा गौरव आहे. गुणवत्ता, समर्पण आणि नवनवीन कल्पनांचा अवलंब करून आम्ही पुढेही उत्कृष्ट कामगिरी करत राहू.”

संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने नवोन्मेषी शिक्षण पद्धती, डिजिटल साधने, कौशल्यविकास कार्यशाळा आणि सामाजिक उपक्रम यांद्वारे विद्यार्थ्यांना समृद्ध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!