शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष अतिश आनंदराव बारणे यांच्या सक्षम सोशल फाउंडेशन वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
या उत्सवामध्ये दांडिया, गरबा अशा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांपैकी 50 विजेत्यांना लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल, तसेच दररोज विजेत्यांना अंतिम स्पर्धेत सहभाग घेणे बंधनकारक राहील.
सदर उत्सव 22 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. सदर उत्सव सिल्वर साक्षी सोसायटी जवळ, बारणे वस्ती येथे होणार आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या स्पर्धकास स्कुटी, दृतिय येणाऱ्या स्पर्धकास फ्रिज, तसेच तृतीय येणाऱ्या स्पर्धकास एलईडी टीव्ही तसेच चौथ्या क्रमांकावर कुलर ,पाचव्या क्रमांकास फॅन आणि सहाव्या येणाऱ्या स्पर्धकास मिक्सर बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या उत्सवामध्ये जास्तीत जास्त महिला भगिनींनी तसेच नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अतिश बारणे यांनी केले आहे.