शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेल व वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या विद्यमानाने 17 सप्टेंबर 2025 हा दिवस ड्रायव्हर डे म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महिला ड्रायव्हर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ड्रायव्हर डे निमित्त मो. वा. निरीक्षक गणेश धनंजय भांगे (RTO) यांनी उपस्थित ड्रायव्हर महिला व पुरुषांना रस्ता सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम आर टी ओ अधिकारी श्री पवन नव्हाडे साहेब यांच्या मार्गदर्शने घेण्यात आला उपस्थित महिला ड्रायव्हर व पुरुषांना गुलाब पुष्प देऊन त्यांना ड्रायव्हर डे च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष विनोद वरखडे, वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मॅनेजर तहल मातव, तसेच स्नेहल पाटील, रूपाली सावंत, प्रिया शेटे, अश्विनी चौहान श्वेता आहेर, प्रियंका निकम, प्रगती खालापुरे, रसिका शेजवळ, संतोष मोरसे, स्वाती पवार, नीलम मसले, साक्षी चव्हाण आदी उपस्थित होते.