spot_img
spot_img
spot_img

MUMBAI : अमेरिकेत आर्यमान आदिक यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार

मुंबईचे आर्यमान अविनाश आदिक यांना त्यांच्या ‘जिद्द’ या लघुपटासाठी ‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन’मध्ये “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार” मिळाला आहे. १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या या चित्रपट महोत्सवात आर्यमान यांनी हा मानाचा पुरस्कार पटकावला. उल्लेखनीय म्हणजे आर्यमान हे या चित्रपटाचे सह-लेखक आणि मुख्य कलाकार देखील आहेत.

भारताचे माजी नंबर १ कनिष्ठ स्क्वॉश खेळाडू आणि २०१७ चे आशियाई सुवर्णपदक विजेते आर्यमान अविनाश आदिक यांनी ‘जिद्द’ या चित्तवेधक क्रीडा नाटकाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट आत्मसंभ्रम, चिकाटी आणि व्यक्तिगत विकासाच्या संघर्षाची गाथा सांगतो.

‘जिद्द’मध्ये राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम फेरीतील एका खेळाडूचे चित्रण आहे, जो आपल्या भूतकाळातील आठवणींशी झुंज देतो. हा चित्रपट प्रत्येक क्रीडापटूच्या संघर्षयात्रेला अभिवादन करतो आणि आर्यमान यांच्या कथाकथनाच्या शैलीमुळे त्यांच्या दोन्ही आवडी – खेळ आणि सिनेमा – यांचा उत्तम मेळ घडवून आणतो.

ट्रिनिटी कॉलेजचे पदवीधर आर्यमान यांनी २०२२ मध्ये भारतात परतल्यानंतर चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश. त्यांनी Amazon Prime च्या ‘शहर लखोट’ (२०२३) आणि Excel Entertainment च्या ‘मडगाव एक्स्प्रेस’ (२०२४) या प्रकल्पांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा आणि क्रीडा अनुभवाच्या आधाराने, आर्यमान बहुस्तरीय कथाकथन करतात. त्यांनी मर्मभेदी संपादन आणि प्रभावी ध्वनी संयोजनाद्वारे मानवी स्वभाव आणि निर्णयप्रक्रियेचा अभ्यास करणारे चित्रपट निर्माण करतात.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!