दापोडी , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगार यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरात पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे दररोज या वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे या महामार्गावर दापोडीच्या परिसरात मेट्रो स्टेशन तसेच त्याच्या शेजारीच बीआरटी बस स्टॉप व याच ठिकाणी सीएनजी पेट्रोल पंप आहे नागरिकांची मोठ्या प्रमाणात येथे रहदारी असते परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पण होत असते आणि या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते येणाऱ्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो याविषयी अनेक सामाजिक संघटनांनी पोलीस प्रशासन वाहतूक विभाग व महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे अनेक वेळा तक्रार देखील दाखल केली आहे परंतु या वाहतूक कोंडीकडे प्रशासन वतीने दुर्लक्ष होत आहे तरी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी या दापोडी परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी ही वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगारे यांनी वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडे केली आहे.