शबनम न्यूज | प्रतिनिधी
राजेश्वरी खरात आणि राहुल दराडे यांची मुख्य भूमिका असलेल्या ” कलवरी” चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट हा ग्रामीण भागातील लग्नाच्या परंपरेवर आधारीत आहे. यात प्रेम कहाणी आणि लग्न हा विषय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा विषय येतो त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाला आपला वाटेल.
या चित्रपटाची निर्मिती RAA films यांनी केली आहे. याचे डायरेक्टर आहेत प्रदीप टोणगे ज्यांनी आयटमगीरी , तीरसाट हे चित्रपट केले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक विकास कुटे आणि रोहित बेलदरे आहेत.
सर्वांची लाडकी राजेश्वरी खरात आणि नवीन चेहरा राहुल दराडे या दोघांची जोडी आपल्याला पहायला मिळेल.