सचिन साठे सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे निलख व विशाल नगर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. या पार्श्वभूमीवर सचिन साठे सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेत महत्त्वाच्या चौकांवर ट्रॅफिक वॉर्डन्सची नेमणूक केली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ १५ सप्टेंबरपासून झाला असून वॉर्डन्स प्रत्यक्ष कार्यरत होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेत आहेत. नागरिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे या उपक्रमाला यश मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.
या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रदीप पाटील (वाहतूक पोलीस निरीक्षक, सांगवी–वाकड विभाग), शिंदे साहेब (पिं.चिं. महानगरपालिका ड प्रभाग स्थापत्य अधिकारी), तसेच भुलेश्वर नांदगुडे, राजाभाऊ मासुळकर, अशोक बालवडकर, संजय दळवी, काळूशेठ नांदगुडे, अनिल संचेती, आनंद कुंभार, अरविंद रणदिवे, नागेश जाधव, संजय पटेल, गोविंद गायकवाड, रवींद्र साठे, अशोक मेंगळे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.