spot_img
spot_img
spot_img

पुण्यात २० सप्टेंबर रोजी ‘अभियंता उद्योजक’ कार्यशाळा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) च्या वतीने मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी कार्यशाळेचे २० सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.

ही कार्यशाळा २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीओईपी अभियांत्रिकी विद्यापीठ, पुणे येथे होणार आहे. या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील यशस्वी व तज्ञ उद्योजक, शासनाच्या उद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेतून उद्योजकांना नवीन संधी आणि मार्गदर्शन ही मिळणार असल्याने मातंग समाजातील उद्योजक, अभियंते आणि होतकरू तरुणांनी या कार्यशाळेत आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वारे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!