पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना पक्षाच्या महिला शहर प्रमुख सौ सरिता अरुण साने यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे.
सौ सरिता साने यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमात बेरोजगार युवक युवतींनी सहभागी व्हावे व नोकरीची संधी मिळवावी असे आवाहन सरीता साने यांनी केले आहे.
सुशिक्षित बेरोजगार व्यक्तींसाठी विविध मोफत कोर्सेस तसेच नोकरीच्या संधी मिळणार आहेत. या उपक्रमात 30 पेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या उपक्रमात अकाउंट एक्झिक्यूटिव्ह, डेटा ऍनॅलिस्ट, डिजिटल मार्केटिंग, ऑफिस एक्झिक्यूटिव्ह, पर्सनल ट्रेनिंग प्लस स्पोर्ट्स न्यूट्रिशन, सीएनसी ऑपरेटर, टू व्हीलर रिपेरिंग, मोबाईल रिपेरिंग, एसी व फ्रिज रिपेरिंग, सर्टिफिकेट कोर्स इन लॉजिस्टिक सेक्टर, पीसीबी असेंबली, रिटेल एक्झिक्यूटिव्ह, प्री स्कूल टीचर्स ट्रेनिंग, सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स, सर्टिफाइड नर्सिंग केअर, ऑटोमोटिव्ह सर्विस असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, मेकअप आर्टिस्ट, जनरल ड्युटी असिस्टंट, आरी वर्क, फॅशन डिझाईनिंग, बेसिक ब्युटी पार्लर या आणि अशा अनेक व्यवसायाच्या संधी तसेच नोकरीच्या संधी युवक युवतींसाठी उपलब्ध होणार आहेत तरी जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवती यांनी सरिताताई साने जनसंपर्क कार्यालय सत्यम ज्वेलर्स जवळ मेगा विजन सिटीस्कॅन समोर निगडी प्राधिकरण पुणे येथे संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.