थेरगाव येथील उर्दू शाळेत केला आदर्श शिक्षकांचा सन्मान!
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात शमीम हुसेन सोशल एज्युकेशन फाउंडेशन वतीने आज थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक उर्दू शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय वस्तू भेट देत सन्मान व आदर्श शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इमरान भाई शेख यांच्या उपस्थितीत तसेच फाउंडेशनच्या अध्यक्ष शबनम सय्यद यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी अति उत्साहाने नात गात केली तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी आपापले कला गुण दाखवीत आनंदित केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शाहिदा सय्यद मॅडम यांच्या सहकार्याने बालवाडी तसेच पहिली ते आठवी वर्गातील उत्तीर्ण होऊन प्रथम आणि द्वितीय गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी शालेय वस्तू भेट देत सन्मान करण्यात आला. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या शाळेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला होता या निमित्ताने शमीम हुसेन फाउंडेशन वतीने त्यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला. यामध्ये उस्ताद बीबी हाजरा जंग बहादूर व नसरीन बानो मोहम्मद सुलतान या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना इमरान भाई शेख म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय भेटवस्तू देऊन सन्मान म्हणजे त्यांच्यावर कौतुकाची थाप आहे, अशाच रीतीने विद्यार्थी घडत असतात व त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असते, लहानपणी सर्वच विद्यार्थी आपापले गुण घडवत असतात यामुळेच भविष्यात देखील त्यांना मदत होते, अशाच रीतीने फाउंडेशनच्या अध्यक्ष शबनम ताई सय्यद यांनी हा उपक्रम राबविला आहे त्यांच्या देखील कार्याचे कौतुक आहे शबनम ताई नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात तसेच त्यांच्याकडून विविध सामाजिक कामे केली जातात. याच अंतर्गत या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट देत हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे आयोजन केल्याबद्दल त्यांचे आणि सहकाऱ्यांचे कौतुक आहे.
याप्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शाहिदा सय्यद म्हणाल्या की, आमच्या शाळेत विविध उपक्रम पार पडतात, विविध कार्यक्रम देखील येथे घेतले जातात. मात्र आजचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी फाउंडेशनच्या अध्यक्ष शबनम सय्यद यांचे कौतुक आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय वस्तू भेट देत त्यांचा केलेला सन्मान यामुळे विद्यार्थी खरोखरच भविष्यात पुढे नक्कीच यश गाठतील आणि या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळालेली कौतुकाची थाप नक्कीच पुढे काम येईल. तसेच शबनम सय्यद यांनी आमच्या शाळेमध्ये आयोजित केल्याबद्दल त्यांचे देखील आभार!
याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक रफी हुसेन, सचिव शाहूल हमीद शेख, पदाधिकारी रमजान सय्यद, सहकारी आसिया इनामदार, फरदीन सय्यद, गजाला सय्यद सर्व शिक्षक मंडळी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजाला सय्यद यांनी केले तर आभार शबनम सय्यद यांनी व्यक्त केले.