spot_img
spot_img
spot_img

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रभाग नाम फलकाचे अनावरण

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहरातर्फे प्रभाग क्रमांक 19 दळवी नगर , भाट नगर, आनंदनगर, विजयनगर, बौद्ध नगर, प्रभागाचे नाम फलकाचे अनावरण कुणाल भाऊ वाव्हळकर (शहराध्यक्ष पि.चि. शहर) यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती-चंद्रकांता ताई सोनकांबळे ( अध्यक्ष महा, प्रदेश महिला आघाडी ) बाळासाहेब भागवत (उपाध्यक्ष महा, प्रदेश) अजिज भाई शेख (प्रदेशाध्यक्ष वाहतूक आघाडी ) धम्म रत्न गायकवाड ( युवक अध्यक्ष) सौ. कमलताई कांबळे (महिला अध्यक्ष) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.


यावेळी धम्मपाल तंतपाळे (वरिष्ठ उपाध्यक्ष पि.चि.शहर) दिनकर म्हस्के (वार्ड अध्यक्ष आनंद नगर चिंचवड) महादेव गुंजाळ (उपाध्यक्ष वाहतूक आघाडी ) संभाजी वाघमारे (उपाध्यक्ष पि.चि.शहर ) योगेश भोसले (कार्याध्यक्ष) वाघमारे ताई, साळवे ताई, सोनवणे ताई कांबळे ताई, राधाताई खंडागळे , प्रज्ञाताई कदम, शितलताई रणसुरे, ममता ताई पवार, नफिसा ताई खान, छायाताई तेलंगे, व संविधान महिला मंडळातील महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या .

यावेळी कुणाल भाऊ वाव्हळकर यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 19 चे नवरनिवाचित अध्यक्षपदी श्री अल्विन शेपर्ड व महिला प्रभाग अध्यक्षपदी वृषाली ताई कदम यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन आयु. सुंदर कांबळे (वरिष्ठ उपाध्यक्ष पि.चि. शहर वरिष्ठ उपाध्यक्ष) आयु. राजेंद्र भाऊ कांबळे (स्वीकृत नगरसेवक) सौ. अनिताताई सुंदर कांबळे (संस्थापक अध्यक्ष ) संविधान महिला मंडळ यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आकाश मित्र मंडळाचे संतोष कुचेकर , तानाजी पवार, वसंत कदम, कृष्णा यादव, विकी डोंगरे, विकास कांबळे, सागर कांबळे, संतोष पवार , करण सरोदे, व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भाऊ कांबळे यांनी केले व आभार धम्म रत्न गायकवाड (शहराध्यक्ष युवक आघाडी) यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!